दहशतवादाविरोधात एक व्हा : राहुल   

श्रीनगर : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात देशातील जनतेने एक व्हावे, हल्ला केवळ फूट पाडण्यासाठी केला गेला आहे. दहशतवादाचा कठोरपणे पराभव करा, असे आवाहन काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. 
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी काल जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. त्या अंतर्गत त्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. अत्यंत बिकट परिस्थितीतून  काश्मीरचे नागरिक जात आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि मदत करण्याच्या हेतूने मी दौर्‍यावर आलो आहे. दहशतवादी हल्ल्याची नागरिकांनी कठोरपणे निंदा करुन देशाला संपूर्ण पाठींबा दिला आहे.  राहुल यांनी काल सकाळी बदामीगढ कँटोन्मेंटच्या लष्कराच्या ९१ बेस हॉस्पिटलला भेट दिली. तेथे उपचार घेणार्‍या जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकींत सर्वच पक्षांनी दहशतवादी हल्ल्याची कठोरपणे निंदा केली आहे. तसेच सरकारच्या सोबत असल्याचे सांगितले आहे. दहशतवादी हल्ला करुन  नागरिकांमध्ये फूटपाडण्याचे कारस्थान हाणून पाडण्याची गरजही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

Related Articles